पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मोटारीची तोडफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 19:53 IST2019-06-04T19:53:08+5:302019-06-04T19:53:57+5:30

पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन मोटारीची तोडफोड केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The car breaken due to complaint registred in police station | पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मोटारीची तोडफोड 

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून मोटारीची तोडफोड 

पिंपरी : पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन मोटारीची तोडफोड केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना म्हाळुंगे येथील राधा चौक येथे सोमवारी मध्यरात्री घडली.अजय निम्हण, आकाश आगवणे, विकास निम्हण, वैभव दळवी, विशाल निम्हण, राजू कांबळे (सर्व रा. निम्हण मळा, पाषाण) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हितेश हरिभाऊ नेटके (वय २९, रा. सुस रोड, पाषाण, साई चौकजवळ, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी नेटके हे राधा चौक येथे मित्राच्या मोटारीत बसून गप्पा मारत होते. दरम्यान, आकाश आगवणे याच्यासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन नेटके यांच्या मोटारीची पुढील व मागील काच फोडून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: The car breaken due to complaint registred in police station