इमारतीच्या स्टोअर रूममधून सव्वा पाच लाखांची केबल वायर चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 18:56 IST2021-07-02T18:55:52+5:302021-07-02T18:56:01+5:30
पिंपरी चिंचवडच्या मोहननगरमध्ये एका इमारतीत घडली घटना

इमारतीच्या स्टोअर रूममधून सव्वा पाच लाखांची केबल वायर चोरीला
ठळक मुद्दे२४ मे ते ३० जून या कालावधीत ५ लाख २६ हजार २०० रुपये किमतीचे केबल वायरचे २१ बंडल चोरले
पिंपरी: इमारतीच्या स्टोअर रूम मधून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख २६ हजार रुपयांची केबल वायरची चोरी केली आहे. पवार बिल्डींग, मोहननगर, चिंचवड येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणी श्रद्धेश जयप्रकाश पवार (वय २४, रा. चिंचवड) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बिल्डिंगची स्टोअर रूम कुलूप लावून बंद होती. स्टोअर रूमच्या दरवाजाची लोखंडी पट्टी उचकटून अज्ञात चोरट्यांनी २४ मे ते ३० जून या कालावधीत ५ लाख २६ हजार २०० रुपये किमतीचे केबल वायरचे २१ बंडल चोरून नेले.