सिंगापूरला पाठवतो म्हणत व्यापाऱ्यासह दोघांना १३.५ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:20 IST2025-06-15T14:18:00+5:302025-06-15T14:20:55+5:30

सिंगापूरमध्ये नोकरी लावतो, असे सांगून एकूण १३.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली

Businessman and two others duped of Rs 13.5 lakhs, claiming to be sending to Singapore | सिंगापूरला पाठवतो म्हणत व्यापाऱ्यासह दोघांना १३.५ लाखांचा गंडा

सिंगापूरला पाठवतो म्हणत व्यापाऱ्यासह दोघांना १३.५ लाखांचा गंडा

पिंपरी : सिंगापूरमध्ये नोकरी लावतो, असे सांगून एकूण १३.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी दापोडी येथील ४० वर्षीय संशयित महिलेविरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना २०२३ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत दिघी येथे घडली. अतुल सुभाष रुणवाल (वय ५१, रा. दिघी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (१३ जून) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल व रवींद्र वाळके यांचा संशयित महिलेने विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सिंगापूरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनुक्रमे ८ लाख व ५.०५ लाख, असे एकूण १३.५ लाख रुपये घेतले. मात्र, वेळोवेळी टाळाटाळ करत नोकरीही लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. पोलिस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.

Web Title: Businessman and two others duped of Rs 13.5 lakhs, claiming to be sending to Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.