शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

घरफोडी, वाहनचोरी करणारे जेरबंद, निगडी पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 04:11 IST

पिंपरी : घरफोडी, वाहनचोरी करणारया दोन सराईत गुन्हेगारांना आणि दोन अल्पवयीन चोरट्याला निगडी पोलिसांनी जेरबंद केले. तसेच बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाºया दोघांना अटक केली आहे.निगडी पोलीस टाळगाव चिखली हद्दीत गस्त घालत असताना परसप्पा सिद्धप्पा होसमनी (वय २८, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मूळगाव कर्नाटक) हा हातात ब्राऊन रंगाची बॅग घेऊन संशयितरित्या फिरत ...

पिंपरी : घरफोडी, वाहनचोरी करणारया दोन सराईत गुन्हेगारांना आणि दोन अल्पवयीन चोरट्याला निगडी पोलिसांनी जेरबंद केले. तसेच बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाºया दोघांना अटक केली आहे.निगडी पोलीस टाळगाव चिखली हद्दीत गस्त घालत असताना परसप्पा सिद्धप्पा होसमनी (वय २८, रा. सोनवणे वस्ती, चिखली, मूळगाव कर्नाटक) हा हातात ब्राऊन रंगाची बॅग घेऊन संशयितरित्या फिरत होता. त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. बॅगेची झडती घेतली असता दोन लॅपटॉप, कागदपत्रे मिळाली. त्याला ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता आठ दिवसांपुर्वी मोशीतील, संभाजीनगर मधून हा ऐवज चोरला असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळील दुकानात घरफोडी करणारा आरोपी आनंद त्र्यंबक इंदुकाने (वय २२, रा. प्राधिकरण, निगडी) यालाही अटक केली. त्याच्याकडून रहात्या घराजवळ लाईट डिपीच्या खाली दडवून ठेवलेले एक लाख ९२ हजारांची रोकड, कॉर्पोरेशन बँकेचे पास बुक, चेक बुक जप्त करण्यात आले. त्याचबरोबर चिखली येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी दोन अल्पवयीन चोरट्याला त्याब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून १ लाख १४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आले. या आरोपींकडून एकूण सात गुन्हे उघडकीस आले.तसेच हद्दीत पेट्रोलिंग करत असताना साईनाथनगर निगडी येथे इस्माईल युसूफ शेख (वय ३६) याच्याकडे गावठी कठ्ठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी कठ्ठा जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर म्हेत्रे कॉर्नर येथे देखील एकाकडे गावठी कठ्ठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुभम नितीन काळभोर (वय,१८ रा. भिमशक्तीनगर, स्पाईनरोड, चिंचवड) याला अटक केली. त्याच्याकडून ६० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.ही कामगिरी निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण, कर्मचारी तात्या तापकीर, किशोर पढेर, विलास केकाण, नारायण जाधव, मच्छिंद्र घनवट, आनंद चव्हाण, स्वामीनाथ जाधव, संदीप पाटील, रमेश मावसकर यांच्या पथकाने केली.वाहनांच्या लागल्या रांगापिंपरी : बस चालकाने रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी साईड दिली नाही म्हणून रुग्णवाहिकेच्या चालकाने शिवनेरी बसची किल्ली काढून नेली. हा प्रकार दापोडी येथे मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडला. या प्रकारामुळे पुणे-मुंबई लेनवर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने पुणे स्टेशन-दादर ही शिवनेरी बस निघाली होती. दापोडी येथील सीएमई जवळ बस आल्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाने बसची किल्ली काढून घेतली.

टॅग्स :Crimeगुन्हा