शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

देहू येथील भक्तनिवासाचे होणार हस्तांतरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 2:21 PM

वैकुंठगमन मंदिर परिसरात भव्य तीन मजली भक्त निवास व अन्नछत्र उभारण्यात आले आहे...

ठळक मुद्दे१२ शिल्पाद्वारे श्रीसंत तुकाराम महाराजांचा जीवनपट पालखी सोहळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार

देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत वैकुंठगमन मंदिर परिसरात भव्य तीन मजली भक्त निवास व अन्नछत्र उभारण्यात आले आहे. यासाठी शासनाने ९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या निधीतून या भक्तनिवासाचे किरकोळ काम सोडता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. या पालखी सोहळ्यात या भक्तनिवासाचे कागदोपत्री अधिकृती संस्थानकडे हंस्तातरण करण्यात येणार आहे. या ९ कोटी रुपयांमध्ये वैकुंठगमन स्थान परिसर व विकास सुधारणेअंतर्गत महाद्वार, भक्तनिवास, अन्नछत्र, तुकाराम महाराज जीवन संग्रहालय, सभामंडप, चप्पल स्टँड आदींचा समावेश आहे. तळमजल्यावर पार्किंग, पाणपोई, चप्पल स्टँड असणार आहे. याशिवाय अन्नछत्र कक्ष, प्रतीक्षा कक्ष, हातधुण्याची खोली, स्वच्छतागृह, धुण्याची खोली, स्वयंपाकगृह, भांडारगृह, संत तुकाराममहाराज जीवन संग्रहालय दालन, जीवन संग्रहालयासाठी प्रतीक्षालय, पहिल्या मजल्यावर छात्रावास, शौचालये, विश्रामगृह, प्रतीक्षागृह, कार्यालय तर दुसऱ्या मजल्यावर छात्रवास, विश्रामगृह, प्रतीक्षागृह, कार्यालय कक्ष, पाणपोई, अशा ९-९ अशा १८ खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये विद्युतपुरवठा कामे झाली आहेत. विद्युत उपकरणे बसविण्याचे कामदेखील अंतिम टप्प्यात असून, पालखी सोहळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. याच इमारतीच्या आवारात १२ शिल्पाद्वारे श्रीसंत तुकाराम महाराजांचा जीवनपटच स्वतंत्र भिंतीवर फायबर ग्लासमध्ये उभारला आहे. या शिल्पांना रंगीत रोषणाई  केली असल्याने हे भाविकांचे दर्शनापाठोपाठ मुख्य आकर्षण असणार आहे. काही कामे सुरू असून, ती पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत. यानंतरच या इमारतीचे हस्तांतरण होणार आहे.

टॅग्स :dehuदेहूsant tukaramसंत तुकाराम