चिडलेल्या आईकडून लाकडी बांबूने बेदम मारहाण; १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By रोशन मोरे | Published: May 16, 2023 03:23 PM2023-05-16T15:23:22+5:302023-05-16T15:23:31+5:30

मुलीला रुग्णालायत दाखल केल्यानंतर आईने खोटी माहिती दिली मात्र पोलीस तपासात खून केल्याचे उघड झाले

brutally beaten with a wooden bamboo by an angry mother Unfortunate death of 13-year-old girl | चिडलेल्या आईकडून लाकडी बांबूने बेदम मारहाण; १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

चिडलेल्या आईकडून लाकडी बांबूने बेदम मारहाण; १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext

पिंपरी : घरातील संपलेल्या साहित्य बद्दल सांगितले नाही म्हणून चिडलेल्या आईने आपल्या १३ वर्षाच्या मुलीला लाकडी बांबुने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१४) थेरगाव येथे दुपारी दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर यांनी सोमवारी (दि.१५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील साहित्य संपल्याने अगोदर सांगितले नाही, या कारणावरून आरोपीने आपल्या मुलीला लाकडी बांबु आणि फळीच्या साह्याने मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या पायाला, पाठीला आणि डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. मुलीला रुग्णालायत दाखल केल्यानंतर आरोपीने मुलीच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपी महिलेने खून केल्याचे उघड झाले.

Web Title: brutally beaten with a wooden bamboo by an angry mother Unfortunate death of 13-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.