शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला', अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
5
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
6
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
7
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
8
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
9
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
10
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
11
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
12
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
13
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
14
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
15
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
16
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
17
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
18
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
19
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
20
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

‘बीआरटी’स हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:25 AM

पिंपरी : शहरातील निगडी ते दापोडी बीआरटी मार्गास नऊ वर्षांनी मुहूर्त सापडणार असून, सेफ्टी आॅडिटमुळे हा प्रकल्प रखडला होता. महापालिकेने या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. आठवडाभरात हा मार्ग सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.राष्टÑवादीची सत्ता असताना त्यांनी २००९ला सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य ...

पिंपरी : शहरातील निगडी ते दापोडी बीआरटी मार्गास नऊ वर्षांनी मुहूर्त सापडणार असून, सेफ्टी आॅडिटमुळे हा प्रकल्प रखडला होता. महापालिकेने या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. आठवडाभरात हा मार्ग सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.राष्टÑवादीची सत्ता असताना त्यांनी २००९ला सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य वाहिनी असणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी-निगडी या बीआरटी मार्गाचे नियोजन केले होते. मात्र, एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र मार्ग असल्याने या मार्गावर बीआरटी यशस्वी होणार नाही, असा दावा करून याबाबत न्यायालयात दावा दाखल झाला होता. तसेच अ‍ॅड़ हिंमतराव जाधव यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.दरम्यानच्या कालखंडात औंध ते रावेत आणि हिंजवडी ते कासारवाडी हे मार्ग सुरू झाले. तसेच काळेवाडी फाटा ते आळंदी रस्ता या मार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. हा मार्गही लवकरच सुरू होणार आहे. महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार पहिल्याच बीआरटी मार्गाचे नियोजन फसल्याने निगडी-दापोडी मार्गास अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेची सूत्रे हातात घेताच बीआरटीमार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सेफ्टी आॅडिट करण्यास सुरुवात केली होती.>स्वयंचलित यंत्रणा, सुरक्षेच्या उपाययोजनाग्रेड सेपरेटर, बीआरटी मार्ग आणि इतर वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग असे एकात एक मार्ग असल्याने सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन केले आहे. या मार्गावरील बस टर्मिनल, थांबे यांचे कामही पूर्ण करण्यात येणार असून, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा असणार आहे. अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, मर्ज इन आणि मर्ज आऊट येथे अपघात होणार नाहीत. क्रॉसिंग आणि चौकांच्या ठिकाणीही अपघात होणार नाही याचीही दक्षता घेतली होती.या मार्गावर येणे आणि जाण्यासाठी साडेतीन मीटर रुंदीच्या दोन लेनधावणार २७६ बस, दिवसाला फेºया होणार २२००मिनिटाला धावणार एक बसबीआरटी मार्गावर झाला २७ कोटी खर्चएकाच तिकिटात प्रवास करता येणारया मार्गावर फक्त पीएमपी बस, रुग्णवाहिका, व्हीआयपी वाहनांना परवानगी.दृष्टीक्षेपात...निगडी ते दापोडी रस्ता ग्रेड सेपरेटरसह २००६ तयार.शहरातील पहिल्या मार्गाचा डीपीआर २००८ मध्ये केला.दापोडी ते पिंपरी, औंध-रावेत, वाकड ते कासारवाडी, कासारवाडी ते देहू-आळंदीरस्ता ५० किलोमीटर मार्गास २०१० मंजुरीबीआरटी मार्गावर २०११ रोजी पीपीपी तत्त्वावर ३६ बसथांबे निर्मितीबीआरटी मार्गासाठी २०१३ मध्ये निविदा मंजूरपुणे-मुंबई रस्ता (दापोडी-निगडी) लांबी १२.५० किलोमीटर. रुंदी ६१ मीटर.बसस्थानके आहेत ३६, सोळा जाण्याच्या मार्गावर आणि सोळा येण्याच्या मार्गावर१ जानेवारीला घेतली सुरक्षेची चाचणी, त्यानंतर २४ आणि २५ जुलैला याचिकाकर्त्यांबरोबर पाहणी.९ आॅगस्टला उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील.<आयआयटी पवई यांच्याकडून सेफ्टी आॅडिट केले होते. या संदर्भातील अहवाल न्यायालयात सादर केला होता. तसेच याचिकाकर्त्यांसमवेत या मार्गावर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली होती. न्यायालयाच्या परवानगीने हा मार्ग लवकरच सुरू करण्याचे नियोजन आहे.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते