Pimpri Chinchwad: घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण; चावा घेऊन पाडला कानाचा तुकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 19:31 IST2022-04-25T19:31:47+5:302022-04-25T19:31:57+5:30

पिंपरीत तिघांनी घरात घुसून तरुणाला आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली

Broke into a house and beat a young man to death; He took a bite and dropped a piece of ear | Pimpri Chinchwad: घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण; चावा घेऊन पाडला कानाचा तुकडा

Pimpri Chinchwad: घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण; चावा घेऊन पाडला कानाचा तुकडा

पिंपरी : तिघांनी घरात घुसून तरुणाला आणि त्याच्या वडिलांना बेदम मारहाण केली. तसेच तरुणाच्या कानाला चावा घेऊन कानाचा तुकडा पाडला. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे रविवारी (दि. २४) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

सिरातुल्ला हसमुल्ल टेलर (वय ५५, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार इरशाद रफिक सलमानी (वय २२), सौजाद रफिक सलमानी (वय ३२), सदाम शौकतअली सलमानी (वय ३५, रा. आकुर्डी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरशाद हा फिर्यादीच्या घरात आला. त्याने काहीही कारण नसताना फिर्यादीच्या घरातील भांडीकुंडी फेकून दिली आणि शिवीगाळ करत फिर्यादीला हाताने मारहाण केली. याबाबत फिर्यादीचा मुलगा निजामुद्दीन (वय ३०) याने आरोपीला जाब विचारला. तू माझ्या वडिलांना शिवीगाळ व मारहाण का करतोस, असे निजामुद्दीन याने आरोपीला विचारले. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांना बोलावून फिर्यादी आणि त्यांचा मुलगा निजामुद्दील याला मारहाण केली. त्यानंतर इरशाद याने निजामुद्दीनच्या कानाला चावा घेतला आणि कानाचा तुकडा पाडला.

Web Title: Broke into a house and beat a young man to death; He took a bite and dropped a piece of ear