शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

बेड्या तोडून आरोपीने केले पलायन

By admin | Updated: August 30, 2015 03:06 IST

लुटमारीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात नेले असता, शनिवारी सायंकाळी साडेपाच

पिंपरी : लुटमारीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात नेले असता, शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले. असा काही प्रकार घडलाच नाही, असा दावा करीत चिंचवड पोलिसांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा शहरात आहे. गंभीर गुन्ह्याची एखादी घटना घडली, तरी असा काही प्रकार घडलाच नाही, असे भासविण्याचे प्रकार चिंचवड पोलिसांकडून अनेकदा घडले आहेत. एका व्यापारी महिलेला दुकान बंद करताना चोरट्याने मारहाण केली. रोकड पळवली. याची तक्रार देण्यास गेलेल्या महिलेला पोलिसांनी दाद दिली नाही. उलट प्रश्नांची सरबत्ती करून तक्रार देण्यापासून परावृत्त केले. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांच्या शिष्ट मंडळाने हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्या वेळी महिलेची तक्रार दाखल करून घेण्याची तयारी पोलिसांनी दाखवली. याच भागातून चार महिन्यांपूर्वी सावकारी तगाद्यामुळे प्रसाद कदम नावाचा व्यावसायिक घरातून निघून गेला आहे. त्याच्या तपासकामी पोलिसांकडून योग्य प्रकारे सहकार्य मिळत नाही. पोलीस कदम कुटुंबीयांना भेटून सावकारांच्या कर्जाची परतफेड करा, असे सांगण्यास येतात, अशी तक्रार पुणे शहर सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्याकडे केली. चिंचवड पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल संशय व्यक्त करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. असे अनेक प्रकार घडत असल्याचे आता चर्चेतून उघड होत आहे. (प्रतिनिधी)‘चिंग्या’ नावाचा आरोपी बेड्या तोडून पोलिसांना गुंगारा देत वायसीएम रुग्णालयातून पसार झाला. याबद्दल ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर माहिती पडली. पोलिसांकडे चौकशी केली असता असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार झाल्याची चर्चा चिंचवड गावातही होती. एक हवालदार आणि एक पोलीस शिपाई यांच्याबरोबर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. आरोपी पळाल्याची नामुष्की ओढवू नये, म्हणून या प्रकाराची वाच्यता होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली. आरोपी पळून गेला नाही. जामीन मिळाल्यामुळे त्याला सोडून दिले, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सी. ए. सांगळे यांनी नमूद केले.