Crime News: आईला शिवीगाळ केली म्हणून मुलाने केला वडीलांचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 13:24 IST2021-10-29T13:22:26+5:302021-10-29T13:24:25+5:30
पिंपरी : वडिलांनी आई, मुलगा आणि इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून मुलाने वडिलांना धक्काबुक्की करत कठड्यावर ढकलून देत ...

Crime News: आईला शिवीगाळ केली म्हणून मुलाने केला वडीलांचा खून
पिंपरी : वडिलांनी आई, मुलगा आणि इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून मुलाने वडिलांना धक्काबुक्की करत कठड्यावर ढकलून देत त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी सकाळी मावळ तालुक्यातील चंदनवाडी चांदखेड येथे घडली. राजू शंकर पारधे (वय ५३) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. त्यांचा मुलगा गणेश राजू पारधे (वय २८, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू पारधे हे आरोपीचे वडील होते. त्यांनी त्यांची पत्नी मंजुळाबाई, मुलगा गणेश आणि घरातील इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून गणेशने वडील राजू यांना धक्काबुक्की केली. तसेच घरासमोरील दगडी कठड्यावर ढकलून दिले. राजू पारधे दगडी कठड्यावर जोरात आपटले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी गणेश याला अटक केली आहे.