पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 18:22 IST2019-10-06T18:21:25+5:302019-10-06T18:22:17+5:30

आढले बुद्रुक (ता. मावळ) येथे दगडखाणीमध्ये मित्रासमवेत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

boy drown into water in maval | पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

चांदखेड : आढले बुद्रुक (ता. मावळ) येथे दगडखाणीमध्ये मित्रासमवेत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणेश संतोष घोटकुले (वय १५) असे  बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश हा शनिवारी संध्याकाळी  आपल्या चार ते पाच मित्रांबरोबर गावाशेजारी असलेल्या दगडखाणीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. पोलिसांबरोबर गावातील स्थानिक तरुणांनी त्याचा शोध घेतला असता रात्री उशीरा त्याचा मृतदेह मिळाला. तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: boy drown into water in maval