आईला मेसेज टाकल्याचा जाब विचारणाऱ्या मुलास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:07 IST2019-01-21T16:00:32+5:302019-01-21T16:07:33+5:30
आईच्या मोबाईलवर मेसेज का टाकता, अशी विचारणा करणाऱ्या मुलास घरात शिरून तिघांनी मारहाण केली.

आईला मेसेज टाकल्याचा जाब विचारणाऱ्या मुलास मारहाण
पिंपरी : आईच्या मोबाईलवर मेसेज का टाकता, अशी विचारणा करणाऱ्या मुलास घरात शिरून तिघांनी मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना दिघी येथे घडली.पंडीत शिंदे, प्रमोद शिंदे आणि विनोद शिंदे (सर्व रा, दिघी) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत एका महिलेने रविवारी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारीला फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी पंडित शिंदे या आरोपीला 'माझ्या आईच्या मोबाइलवर मेसेज का टाकता,' अशी सर्वांसमक्ष विचारणा केली. या कारणावरून चिडलेल्या आरोपी पंडित याने आपल्या साथीदारांना घेऊन मुलास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी मध्यस्थी करण्यास गेलेल्या आईचा आरोपीने विनयभंग केला. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.