शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीतून बेपत्ता तरुणाचा मृतदेह नागपुरात आढळला; घातपात कि आत्महत्या पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 14:18 IST

१९ तारखेला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामावरून दुचाकीवर घरी निघाला होता. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही

पिंपरी : हिंजवडी येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या पाण्यात शनिवारी (दि.२१) मिळून आला. ही आत्महत्या आहे की काही घातपात याचा तपास पोलिस करत आहेत. सुरजकुमार विलास बांबल (वय ३२, रा.शिवगणेश नगर, पुणे) असे मृताचे नाव आहे. सुरजकुमार बेपत्ता असल्याविषयी हिंजवडीपोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.१९) विलास रंगरावजी बांबल (६३, रा. शिवगणेश नगर धावडे वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरजकुमार हा हिंजवडीमधील आयटी कंपनीत काम करत होता. तो गुरुवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी निघाला होता. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. घरच्यांनी त्याचा शोध घेत हिंजवडी पोलिस ठाण्यात तो हरवला असल्याबाबतची फिर्याद दिली. पोलिस त्याचा शोध घेत असतानाच शनिवारी (दि.२१) सकाळी सातच्या सुमारास नागपूर पोलिसांना सुरजकुमार याचा मृतदेह अंबाझरी तलावात सापडला. सुरजकुमारच्या खिशातील कागदपत्रावरून त्याचे नाव पोलिसांना समजले. सुरजकुमार हा पुण्याहून नागपूरला कसा आला? त्याने आत्महत्या केली की घातपात झाला याविषयी पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू