शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या 'मास्टरप्लॅन'ने विरोधकांच्या आंदोलनाचा उडाला फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 8:25 PM

मागील आठवड्यातील गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवरील अपक्ष सदस्य निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी गोंधळ घातला होता...

पिंपरी : कोरोना आणि स्थायी समितीवर अपक्ष म्हणून निवड केलेल्या सदस्य निवडीवरून विरोधक कोंडीत पकडणार असल्याची चाहुल लागल्याने कोणतेही कारण न देता सत्ताधारी भाजपाने महापालिकेची सभा तहकूब केली. आंदोलनाच्या तयारीने आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा फज्जा उडाला.  

मागील आठवड्यातील गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवरील अपक्ष सदस्य निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी नियुक्तीस मंजुरी देऊन महापौरांनी सभा सोमवारपर्यंत तहकूब केली होती.   पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब सभा सोमवारी झाली.  सभेची वेळ दोनची असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहाबाहेरच होते. तर सभेला बोटावर मोजण्याइतके सभासद सभागृहात हजर होते. त्यामुळे आंदोलनाची कुणकूण लागलेल्या सत्ताधारी पक्षाने सभेचे कामकाज सुरू केले. याचवेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सभेच्या सुरुवातीलाच सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला भाजपचे विकास डोळस यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नऊ मार्चपर्यंत तहकूब केल्याचे महापौर उषा ढोरे यांनी जाहीर केले...................टायमिंग चुकलेकोवीड बीले आणि अपक्ष निवडीवरून विरोधी पक्ष आंदोलन करणार होता. याच्या तयारीसाठी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह नगरसेवक विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयात होते.  भाजप हटाव, महापालिका बचाव असे शर्ट परिधान करून विरोधीपक्षाचे सदस्य दोन वाजून दहा मिनिटांनी  सभागृहात आले. त्यावेळी राष्ट्रगीत सुरू झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचा आंदोलनाचा डाव फसला.............................  कोणतेही सबळ कारण न देता ही सभा पुढे ढकलली आहे. सर्वसाधारण सभेत शहराचे प्रश्न, समस्या आणि गरजा सदस्य मांडत असतात. मात्र सत्ताधारी त्यांचे अंतर्गत राजकारण आणि त्यांच्या सोयीनुसार महापालिका सभेकडे पाहत आहे. गुरुवारी सदस्यांनी गोंधळ घातला म्हणून सभा तहकूब करण्यात आली.  सत्ताधाºयांनी त्यांच्या सोयीसाठीच आजची  सभा तहकूब केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.................... महापालिकेची स्थायी समितीची विशेष सभा अडीच वाजता होती. तर महापौर उषा ढोरे यांचे काही खासगी कार्यक्रम आहेत. त्यामुळे वेळेनुसार सभेचे कामकाज सुरू केले होते. महापौरांनी नऊ मार्चपर्यंत सर्वसाधारण सभा तहकूब केली आहे.नामदेव ढाके (सत्तारुढ पक्षनेते )

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण