शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

पिंपरीत भाजपाचे कुंदन गायकवाड यांचे नगरसेवकपद कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 7:29 PM

पिंपरी-चिंचवडपालिकेच्या निवडणुकीत गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक अ मधून अनुसूचित जाती या राखीव जागेतून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले...

ठळक मुद्देफेरतपासणीमध्ये समितीने जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय

पिंपरी : बुलढाणा जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द केले होते. फेरतपासणीत जात प्रमाणपत्र वैध ठरल्याने राज्य निवडणूक आयोगाने गायकवाड यांचे नगरसेवकपद कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत.   पिंपरी-चिंचवडपालिकेच्या निवडणुकीत गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक अ मधून अनुसूचित जाती या राखीव जागेतून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले. त्यांनी हिंदू-कैकाडी जातीचा दाखला दिला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन रोकडे यांनी गायकवाड यांच्या दाखल्यावर हरकत घेऊन बुलढाणा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार समितीने गायकवाड याचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला. त्याआधारे आयुक्त हर्डीकर यांनी गायकवाड याचे नगरसेवक पद रद्द केले. त्यामुळे मानधन व सभाभत्त्याच्या एकूण साडेचार लाख रुपये पालिकेकडे जमा करण्याचा सूचना नगरसचिव कार्यालयाने दिल्या होत्या. दरम्यान, गायकवाड यांनी समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. गायकवाड याचे जात प्रमाणपत्राची सहा महिन्यांच्या मुदत फेरतपासणीचे आदेश न्यायालयाने समितीला दिले होते. फेरतपासणीमध्ये समितीने जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला. मात्र, त्याचे नगरसेवक पद रद्दची कारवाई पालिकेने पूर्वीच केल्याने पालिका प्रशासनासमोर कोणता निर्णय घ्यायचा हा प्रश्न होता. याबाबत पालिकेने जात दाखला वैध ठरल्याचा निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी मार्गदर्शन मागितले होते. गायकवाड याचा जात दाखला वैध असल्याने नगरसेवकपद रद्दचे आदेश रद्द करून त्याचे नगरसेवकपद कायम ठेवण्यात यावे, असे निर्देश आयोगाचे सहसचिव राजाराम झेंडे यांनी दिले. त्यानुसार आयुक्तांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद कायम ठेवण्याचे आदेश नगर सचिव कार्यालयास सोमवारी दिले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपा