पिंपळे गुरवमध्ये स्कूल बसने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 08:21 IST2022-12-21T08:19:10+5:302022-12-21T08:21:05+5:30
दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला

पिंपळे गुरवमध्ये स्कूल बसने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पिंपरी : स्कूल बसने चिरडल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात मंगळवारी (दि. २०) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
शैलेश गजानन जगताप (वय २९, रा. नेताजी नगर, पिंपळे गुरव), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश मंगळवारी दुपारी पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकाकडून काटे पुरम चौकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. दरम्यान, स्कूल बसला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीचा धक्का बसला. त्यामुळे शैलेश बसच्या चाकाखाली चिरडला गेला. गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबरला याच ठिकाणी झालेल्या अपघातात एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.