Pimpri Chinchwad: भरधाव मिनीबसने दुचाकीला उडवले; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 11:05 IST2023-11-27T11:01:14+5:302023-11-27T11:05:01+5:30
पोलिसांनी मिनीबस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे....

Pimpri Chinchwad: भरधाव मिनीबसने दुचाकीला उडवले; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
पिंपरी : भरधाव वेगाने येणाऱ्या मिनी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणारे दोघेजण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. अनिकेत बालाजी गायकवाड (२१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २४) चिंचवडमधील ग्रिव्हीअस कॉटन कंपनीच्या जवळील आकुर्डी लिंकरोडवर घडली. या प्रकरणी स्वप्निल संजय पवार (१९, रा. निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मिनीबस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्निल त्यांचा मित्र अनिकेत गायकवाड आणि शुभम गायकवाड असे तिघे जण दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या मिनी बस (क्र. एमएच १४ सीडब्ल्यू ४१३६) वरील चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये फिर्यादीचा मित्र शुभम गंभीर जखमी झाला तर अनिकेत याचा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.