Pimpri Chinchwad: वडमुखवाडीमध्ये चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 09:02 IST2024-02-14T08:59:12+5:302024-02-14T09:02:27+5:30
वडमुखवाडी येथे तापकीर चौकाजवळ रविवारी (दि. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला....

Pimpri Chinchwad: वडमुखवाडीमध्ये चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी
पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तसेच एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. वडमुखवाडी येथे तापकीर चौकाजवळ रविवारी (दि. ११) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
सुनील दिलीप चौरे (३०, रा. पाषाण, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तसेच अनिल धर्मेंद्र चव्हाण (२७, रा. भुंडेवस्ती, बावधन, पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. गणेश बालाजी शेडगे (२५, रा. पाषाण, पुणे) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १२) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कालिदास पंढरीनाथ बिरादार (रा. चऱ्होली खुर्द, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील चौरे आणि अनिल चव्हाण हे दोघेही दुचाकीवरून जात होते. त्यावेळी कालिदास याच्या ताब्यातील भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात सुनील चौरे यांचा मृत्यू झाला. तसेच अनिल चव्हाण जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.