शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

किशोर आवारे प्रकरणात मोठी अपडेट! कानशिलात लगावली म्हणून हत्या, गौरव खळदेने रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 14:02 IST

नगर परिषदेच्या इथे आवारे यांनी सर्वांसमोर भालचंद्र खळदे यांच्या कानशिलात लगावली, म्ह्णून गौरव खळदेने हत्या घडवून आणली

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली होती. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर, संदीप मोरे (रा. आकुर्डी), सीनु उर्फे श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगळ (रा.देहुरोड), गौरव खळदे (रा. तळेगाव दाभाडे)  अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला वेगळं वळण मिळालं आहे. आवारे यांनी डिसेंबर महिन्यात भालचंद्र (भानू) खळदे यांना नगर परिषदेतील सीईओच्या दालनात सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. हाच बदला घेण्यासाठी भालचंद्र खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने किशोर आवारे यांची हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.१२) किशोर आवारे यांची तळेगाव नगपरिषदेच्या आवारात गोळ्या घालून तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखाचे पथकाने शनिवारी दुपारपर्यंत रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर यांना अटक केली. तर, खंडणी विरोधी पथक २ यांनी  संदीप मोरे याला बातमीदारामार्फेत मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्वेनगर येथून अटक केली आहे. 

आठ दिवसांची कोठडी

आरोपी रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर, संदीप मोरे यांना पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालाने त्यांना आठ दिवसांची कोठडी सुनावली.

गुन्हेगारांना अटक करून कडक शिक्षा करावे

मावळ परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढत आहे. जमिनींना सोन्याचा भाव आल्याने तसेच राजकीय वर्चस्वाच्या वादामध्ये खून होण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची तळेगाव मध्ये निघृणपणे हत्या करण्यात आली होते. तर काही दिवसांपूर्वी सोमाटणे फाटा येथे एका सरपंचाची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी नगरपालिका आवारामध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चार जणांनी येऊन आवारे यांच्यावर गोळीबार केला तसेच ते जमिनीवर धारातीर्थी पडल्यानंतर शरीर निपचित झाल्यानंतर हल्लेखोर त्यांच्यावर वार करत होते. अगदी अमानुषपणे! सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अंगावर काटे आणल्याशिवाय राहत नाही. ही घटना समोर घडत असताना  कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर हत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मावळ परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हेगारांना कशाचीही भीती न  राहिल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर गुन्हेगारांना अटक करून कडक शिक्षा करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकmavalमावळ