शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी जळीतकांड प्रकरणात मोठी अपडेट! चालकाला डिस्चार्ज, पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:37 IST

जळीतकांड घटनेनंतर चालक हंबर्डीकर मेडिकल कस्टडी मध्ये उपचार घेत होता, आज डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले

पुणे: पुण्याच्या हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलच्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं होतं. दिवाळीचा बोनस न दिल्याने आणि इतर कामेही सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे उघडकीस आले आहे. जनार्दन हंबर्डीकर असं या चालकाचं नाव आहे. नियोजनबद्द कट रचून त्याने हा प्रकार केला असल्याचं समोर आलं मात्र या चालकाने कंपनीवर जे आरोप केले, ते कंपनी मालकाने  फेटाळून लावले लावले आहेत. 

आता मात्र हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर चालक जनार्दन हंबर्डीकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवल्यानंतर चालकाचा ही पाय यात भाजला होता तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच अन्य पाच कर्मचारी ही गंभीर जखमी झाले होते. 19 मार्चला ही घटना घडली. तेंव्हापासून चालक मेडिकल कस्टडी मध्ये उपचार घेत होता. आज डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी हंबर्डीकरला ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं? 

हिंजवडीतील फेज 2 मधील व्योम ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन टेम्पो सकाळी पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाले होते. त्यावेळी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस अचानक आग लागली. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली. टेम्पो ट्रॅव्हलर चा चालक जनार्दन हंबर्डीकर यांनीच हे सर्व कृत्य घडवून आणल्याच उघडकीस आले. आरोपी चालकाने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच वारजे येथून काडीपेटी घेतली होती. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या, उडी मारली. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला. स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलDeathमृत्यूPune Crimeपुणे क्राईम बातम्या