चिंचवड परिसरात खासगी कंपनीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 19:09 IST2020-01-14T19:01:01+5:302020-01-14T19:09:17+5:30
डीसी कंपनीच्या आवारात भीषण आग

चिंचवड परिसरात खासगी कंपनीला भीषण आग
ठळक मुद्देआग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
पिंपरी-चिंचवड :चिंचवड स्टेशन परिसरात डीसी कंपनीच्या आवारात भीषण आग लागली. ही घटना मंगळवारी (दि.१४) सायंकाळी सहा वाजता घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.मात्र या आगीमुळे धुराचे मोठे कल्लोळ परिसरात पसरले आहेत.याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असल्याने आग वाढली आहे.परिसरात आग पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली असून घटनास्थळी पोलिसांचे पथक तैनात झाले आहे. अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.