पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला फेकले नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 06:35 IST2017-08-30T06:35:10+5:302017-08-30T06:35:25+5:30

पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी टपरीचालक तरुणाला मारहाण करत पुलावरून नदीपात्रात फेकले. सुदैवाने नागरिकांच्या व अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे प्राण वाचले.

Because of the money given to the youth, the river thrown into the river | पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला फेकले नदीत

पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला फेकले नदीत

पिंपरी : पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी टपरीचालक तरुणाला मारहाण करत पुलावरून नदीपात्रात फेकले. सुदैवाने नागरिकांच्या व अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास सांगवी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर संजय चंदनशिवे (वय १८, रा. हनुमान मंदिराजवळ, औंध) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. चंदनशिवे याची सांगवी बसस्थानकाजवळ टपरी आहे. तो टपरीत बसला असताना तिघे जण त्याच्याकडे आले. त्यांनी चंदनशिवे याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, चंदनशिवे याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तिघा आरोपींनी त्याला पुलावर नेऊन मारहाण केली आणि उचलून नदीपात्रात फेकले.
महापालिका अग्निशामक दलाचे जवान सध्या गणेश विसर्जनानिमित्त नदीघाटावर तैनात आहेत. घाटावर पाहणी करण्यासाठी आलेल्या उप अधिकारी सूर्यकांत मठपती यांना नागरिकांनी तरुण नदीत पडल्याचे सांगितले. मठपती यांच्यासह त्यांच्या सहकाºयांनी नदीत पाहणी करून चंदनशिवे याला बाहेर काढले.

Web Title: Because of the money given to the youth, the river thrown into the river