Pimpri-Chinchwad Crime | "पैसे नाही दिले तर मुलाला जिवंत सोडणार नाही..." धमकी देत तरुणाला मारहाण
By रोशन मोरे | Updated: March 20, 2023 18:28 IST2023-03-20T18:27:29+5:302023-03-20T18:28:33+5:30
फिर्यादी यांच्यासोबत आरोपी आदित्य याने हॉटेल व्यवसाय सुरु केला होता...

Pimpri-Chinchwad Crime | "पैसे नाही दिले तर मुलाला जिवंत सोडणार नाही..." धमकी देत तरुणाला मारहाण
पिंपरी : हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी तुझ्या पार्टनरने आमच्याकडून २० हजार रुपये घेतले. ते तू परत कर असे म्हणत तरुणाला मारहाण केली. तसेच त्याचा आईला फोन करून पैसे परत केले नाही तर मुलाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना १७ सप्टेंबर २०२२ रोजी भोसरी येथे घडली. या प्रकरणी जेरी जोसेफ ॲन्ड्रस (वय २०, कर्जत, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आदित्य दिपक चव्हाण (वय २५, रा. भोसरी), ओंकार विधाते, निखील उडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासोबत आरोपी आदित्य याने हॉटेल व्यवसाय सुरु केला. मात्र, व्यवसाय सुरू होईन चार महिने झाले तरी कुठलाही हिशोब दिला नाही. तेव्हा फिर्यादीला आरोपींनी जबरदस्तीने दुचाकीवर बसून भोसरीतील एका टपरी जवळ नेले. तेथे आरोपी निखील याने तुझ्या पार्टनरने आमच्याकडून २० हजार रुपये घेतले ते तु परत कर, असे म्हणत फिर्यादीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या आईला फोन करून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.