भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 20:53 IST2019-08-02T20:51:59+5:302019-08-02T20:53:26+5:30

जुन्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सांगवी भागात घडली आहे.

Beating a boy out of anger | भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण

भांडणाच्या रागातून तरुणाला मारहाण

पिंपरी : भांडणाचा राग मनात धरून हत्याराने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. पिंपळे निलख येथील गणेश नगरमध्ये बुधवारी (दि. ३१) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सांगवी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत मधुकर पवार (वय २४) असे मारहाणीत जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय पिल्ले व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भरत व विजय यांच्यामध्ये बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपी विजय त्याच्या दोन साथीदारांसह रात्री दहाच्या सुमारास भरत रहात असलेल्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये आला. त्याने भरत याला कठीण हत्याराने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात भरत गंभीर जखमी झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Beating a boy out of anger