मोरवाडी येथे दारू पिण्यास पैसे मागितल्याचा जाब विचारल्याने चौघांना मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:07 IST2020-05-14T16:05:38+5:302020-05-14T16:07:50+5:30

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

beaten to four person due to asking for money to drink alcohol | मोरवाडी येथे दारू पिण्यास पैसे मागितल्याचा जाब विचारल्याने चौघांना मारहाण 

मोरवाडी येथे दारू पिण्यास पैसे मागितल्याचा जाब विचारल्याने चौघांना मारहाण 

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याचा जाब विचारण्याच्या रागातून चौघांना मारहाण केली. यात दोन जण जखमी झाले. मोरवाडी लाल टोपी नगर येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. 
अविनाश रामा मासाळकर व तय्यब अब्दुल चौधरी, अशी जखमी अब्दुल अजित चौधरी (वय ४५, रा. लाल टोपी नगर, मोरवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल शेख (वय १९), समीर मुन्शी शेख (वय २५) व बबन मुन्शी शेख (वय १९, तिघे रा. लाल टोपी नगर मोरवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले व त्यांना चिडविले. त्यामुळे फिर्यादी यांची मुलगी सकाम शकाम व मुलगा शहजाद यांनी त्याचा जाब विचारला म्हणून आरोपी यांनी मनात राग ठेवून फिर्यादी यांच्या घरासमोर आले. शिवीगाळ करून त्यांनी अब्दुल यांची मुलगी शबनम व मुलगा यांना मारहाण केली. शहजाद याचा मित्र अविनाश मासाळकर याच्या डोक्यात कोयता मारला. तसेच तय्यब चौधरी याला लोखंडी पट्टीने मारहाण केली. यात ते दोघे जखमी झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: beaten to four person due to asking for money to drink alcohol