शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Baba Adhav Passes Away: उद्योगनगरीचा आवाज हरपला...! डॉ. बाबा आढाव यांचे निधन

By विश्वास मोरे | Updated: December 9, 2025 11:54 IST

पिंपरी-चिंचवड आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांचे अनोखे नाते होते. रिक्षा पंचायतीसह १८ संघटनांच्या माध्यमातून बाबांचे या कामगारनगरीशी घट्ट बंध होते. हमालांपासून अंगणवाडी सेविकांपर्यतच्या कष्टकऱ्यांचा आवाज बनण्याचे काम बाबांनी केले. त्यातून अनेक कार्यकर्ते घडले आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांचे अनोखे नाते होते. रिक्षा पंचायतीसह १८ संघटनांच्या माध्यमातून बाबांचे या कामगारनगरीशी घट्ट बंध होते. हमालांपासून अंगणवाडी सेविकांपर्यतच्या कष्टकऱ्यांचा आवाज बनण्याचे काम बाबांनी केले. त्यातून अनेक कार्यकर्ते घडले आहेत.

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचा विकास होत असताना १९९४ मध्ये जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चौकात इंदिरा गांधी ऑटो रिक्षा थांब्याचे उद्घाटन बाबा आढाव यांच्या हस्ते झाले होते. सुरुवातीला या संघटनेचे दोनशे सदस्य होते. एकतीस वर्षांत दोन हजारांहून अधिक सदस्यसंख्या झाली आहे.

बाबांमुळे रिक्षा पंचायतीसह असंघटित कामगार संघटना, कचरावेचक कामगार संघटना, पथारी संघटना, हमाल पंचायत, कागद काचवेचक संघटना, दिव्यांग संघटना, अंगणवाडी सेविका संघटना, मोलकरीण संघटना अशा विविध संघटना उभ्या राहिल्या. रिक्षा पंचायतीचे पहिले अध्यक्ष आत्माराम नाणेकर म्हणाले, पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकाजवळच इंदिरा गांधी ऑटो रिक्षाथांबा सुरू केला होता. बाबा अत्यंत साधा माणूस. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते घडले आणि अनेक कष्टकऱ्यांना न्याय मिळाला. युती सरकारवेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे असताना पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत अनेकवेळा बैठका झाल्या. त्यावेळी बाबांना शासन पातळीवर मिळणारा सन्मान आणि दबदबा आम्ही जवळून पहिला होता. दिल्लीपर्यंत कष्टकऱ्यांचा आवाज बाबांनी पोहोचवला.- डॉ. विश्वास मोरे 

हमाल पंचायत प्रभावीपुणे-मुंबई लोहमार्गावरील चिंचवड आणि पिंपरी ही महत्त्वाची रेल्वेस्थानके असून, तेथे हमाल पंचायतीची स्थापना बाबांनी केली होती. पिंपरी कॅम्प परिसरामध्ये हमाल पंचायतीचे कार्यालय होते. सध्या चिंचवड स्थानक येथेही पंचायतीचे कार्यालय आहे. कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये मानव कांबळे, मारुती भापकर, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी बाबांना साथ दिली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Baba Adhav, Voice of Laborers, Passes Away: An Era Ends

Web Summary : Labor leader Baba Adhav, champion of Pimpri-Chinchwad's workers, passed away. He founded numerous unions, including the Rickshaw Panchayat, advocating for the rights of laborers, from loaders to Anganwadi workers, leaving behind a legacy of activism and social justice.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र