चालकाला मारहाण करून पळवली रिक्षा; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:51 IST2022-04-30T17:41:18+5:302022-04-30T17:51:11+5:30
पिंपरी : तरुणाने रिक्षाचालकाला मारहाण केली. त्यानंतर रिक्षा जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेला. पोलिसांनी तरुणाला अटक केली. टावर लाइन रोड, ...

चालकाला मारहाण करून पळवली रिक्षा; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना
पिंपरी : तरुणाने रिक्षाचालकाला मारहाण केली. त्यानंतर रिक्षा जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेला. पोलिसांनी तरुणाला अटक केली. टावर लाइन रोड, मोरेवस्ती, चिखली येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
गौरव अनिल सरोदे (वय २५, रा. टावर लाइन, मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हनुमान एकनाथ निंबाळकर (वय २५, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. २९) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मारहाण करून फिर्यादीच्या ताब्यातील दीड लाख रुपये किंमतीची रिक्षा जबरदस्तीने हिसकावून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. जबरदस्तीने हिसकावून नेलेली रिक्षा आरोपीकडे मिळून आली.