शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: प्राधिकरणात चेंबरमध्ये उतरले; विषारी वायूमुळे ३ जणांचा गुदमरून मृत्यू, परिसरात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:51 IST

एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस साजरा होत असताना दुसरीकडे प्राधिकरणात गटारी मधील विषारी वायुने तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला

पिंपरी: एका दूरसंचार कंपनीच्या वायरचे काम करण्यासाठी गटारी मध्ये तिघेजण उतरले. विषारी वायूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी प्राधिकरणातील भेळ चौकात घडली. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्राधिकरणातील भेळ चौकात अ प्रभाग कार्यालयाच्यासमोर समोरील रस्त्यावर मलनिस्सारण वाहिनी आहे. नागरिकांची तक्रार आल्याने दुपारच्या सुमारास एका दूरसंचार कंपनीच्या वायरच्या संदर्भात काम करण्यासाठी चार जण कर्मचारी येथे आले. त्यांची वायर ही मलनिस्सारण वाहिनीच्या  जवळून जात होती. मल निसरण वाहिनीचे झाकण उघडून त्यामुळे एकेक करून तीन जण आतमध्ये उतरले. तर एक जण बाहेरच होता. बराच वेळ झाल्यानंतरही आतून प्रतिसाद येत नसल्याने चौथ्या कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक आले. अग्निशामक दलाच्या पथकास पाचरण करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक दलाने मलिनिसरण वाहिनीमधील तिघा जणांना बाहेर काढले. ते बेशुद्ध असल्याने त्यांना तातडीने जवळच्या लोकमान्य रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.  

असा सा झाला उलगडा?

मल:निसारण वाहिनीमध्ये उतरलेले कर्मचारी हे आरोग्य विभागाचे असावेत, मात्र प्रत्यक्ष दर्शनी चौकशी केल्यानंतर हे कर्मचारी एका दूरसंचार कंपनीचे असल्याचे समजले.  मृतांची नावे पूर्णपणे समजली नसून वाचलेल्या चौथ्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाचे नाव दत्ता, दुसऱ्याचं नाव रावसाहेब आणि तिसऱ्याच नाव लखन अशोक धीवर (वय ३२, बिजलीनगर) असे आहे. मलनिस्सारण वाहिनीमध्ये जाऊन ही तिघेजण काय करत होते, याबाबत ठोस माहिती मिळाली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

प्राधिकरणात हळहळ 

एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस साजरा होत असताना दुसरीकडे प्राधिकरणात गटारी मधील विषारी वायुने तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर वृत्त पसरले आणि गर्दी जमली 

"चेंबरमध्ये तिघांचा मृत्यू" बातमी सोशल मीडियावर पसरली आणि प्राधिकरणातील घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली  होती.  महापालिकेच्या आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष सागर चरण हेही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी केली. त्यावेळी संबंधित कर्मचारी हे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नव्हते तर ते एका दूरसंचार कंपनीचे होते अशी माहिती पुढे आली.

 सागर चरण म्हणाले, "आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असतात. घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर मदत कार्य करण्यासाठी आम्ही तातडीने आलो.  त्यावेळेस तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. हे कर्मचारी महापालिका आरोग्य विभागाचे नाहीत. तर एका दूरसंचार कंपनीचे आहेत. ते वायरचे काम करण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळाली आहे. चेंबर मध्ये तिघांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. "

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाIndependence Dayस्वातंत्र्य दिनDeathमृत्यूEmployeeकर्मचारीhospitalहॉस्पिटल