गांजा विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी उधळला; पिंपरीत पावणेदहा लाखांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 19:33 IST2020-10-29T19:23:50+5:302020-10-29T19:33:39+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरीत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.

गांजा विक्रीचा प्रयत्न पोलिसांनी उधळला; पिंपरीत पावणेदहा लाखांचा साठा जप्त
पिंपरी : गांजा विक्रीचे दोन प्रयत्न पोलिसांनी उधळून लावले आहेत. एका घटनेत पावणेदहा लाख रुपयांचा दहा किलो आणि दुसऱ्या घटनेत एक हजार रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. देहूरस्ता आणि वाकड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
किवळे सर्व्हिस रस्त्यावरील ब्रिजखली गांजा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ९ लाख ६५ हजार १७५ रुपयांचा दहा किलो गांजा देहूरोड पोलिसांनी जप्त केला. अमोल नारायण अडाल (वय २६, गुरुकृपा सोसायटी, मोरेवस्ती चिखली), अल्ताफ पाशा तांबोळी (वय ४०, आंबेडकर नगर कोंढवा), नाईम रफिक शेख (वय ३०, थेरगाव पुणे), लक्ष्मण चौघुले (वय २१, जयहिंद कॉलनी, रहाटणी फाटा, काळेवाडी), सुधीर पांडुरंग देवकाते (वय २४, माहिजळगाव, कर्जत) याना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे.
सुशीला देसाई लष्करे (वय ३५), अभयकुमार देवेंद्रनाथ परडा (वय३८, दोघे रा. काळाखडक झोपडपट्टी वाकड) यांच्याकडे एक हजार रुपये किमतीचा पन्नास ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.