वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 01:07 PM2021-07-27T13:07:45+5:302021-07-27T13:07:54+5:30

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

Attempted murder in ancestral land dispute; Both seriously injured | वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दोघे गंभीर जखमी

वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; दोघे गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देजीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाड, लोखंडी रॉड, लाकडी बांबूने मारहाण

पिंपरी : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पारखे वस्ती, माण, ता. मुळशी येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. 

विजय हनुमंत सुतार, सौरभ विजय सुतार, वैभव विजय सुतार, शितल विजय सुतार (सर्व रा. पारखे वस्ती, माण, ता. मुळशी), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी शितलला पोलिसांनीअटक केली आहे. प्रियांका शशिकांत सुतार (वय ३०, रा. पारखे वस्ती, माण) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २६) फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार व आरोपी हे नातेवाईक आहेत. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून आरोपींनी त्यांचे पती शशिकांत भगवान सुतार व सासरे भगवान बळीराम सुतार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाड, लोखंडी रॉड, लाकडी बांबूने मारहाण केली. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Attempted murder in ancestral land dispute; Both seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app