पत्नीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; देहूरोड परिसरातील घटना

By नारायण बडगुजर | Updated: May 25, 2024 15:37 IST2024-05-25T15:36:49+5:302024-05-25T15:37:10+5:30

देहूरोड येथील शितळा नगरमध्ये शुक्रवारी (दि. २४) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली...

Attempt to kill wife by stabbing her; Incidents in Dehur Road area | पत्नीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; देहूरोड परिसरातील घटना

पत्नीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न; देहूरोड परिसरातील घटना

 पिंपरी : कौटुंबिक कारणावरून पती-पत्नीचे भांडण झाले. त्यानंतर पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. देहूरोड येथील शितळा नगरमध्ये शुक्रवारी (दि. २४) दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गिलानी समाझी कुरेशी (४६, रा. शितळानगर, देहूरोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याच्या ४६ वर्षीय पत्नीने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचा पती गिलानी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. यामुळे चिडलेल्या पती गिलानी याने पत्नीला शिवीगाळ केली. तुला आता खल्लास करून टाकतो, असे म्हणत तिच्यावर कोयत्याने डोक्यावर, हातावर वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलिस निरीक्षक आशिष जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Attempt to kill wife by stabbing her; Incidents in Dehur Road area