पादचाऱ्याकडील ऐवज लुटून केली लोखंडी गजाने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:45 IST2019-04-12T16:35:27+5:302019-04-12T16:45:26+5:30
पादचाऱ्याकडील ऐवज लुटून लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पादचाऱ्याकडील ऐवज लुटून केली लोखंडी गजाने मारहाण
पिंपरी : पादचाऱ्याकडील ऐवज लुटून लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
जुबेर शेख, फिरोज डंके, सचिन थोरात, बाळा कोंढाळकर (सर्व रा. यमुनानगर, निगडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजु गणपत उबाळे (वय ४०, रा. अण्णाभाऊ साठेनगर, पीसीएमसी वसाहत, ओटास्कीम निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास उबाळे हे त्यांचे मित्र गणेशन यांच्यासोबत पुणे-मुंबई भाडे केल्याची पोहोचपावती देण्यासाठी निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे पायी जात होते. त्यावेळी काळभोर यांच्या हॉटेलच्या पाठीमागून रस्ता ओलांडत असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यांच्याकडील मोबाईल व रोकड असा बारा हजारांचा ऐवज लुटुन त्यांना लोखंडी गजाने तसेच दगडाने मारहाण केली. त्यानंतर तेथून पसार झाले. या घटनेत उबाळे जखमी झाले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.