Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत
By विश्वास मोरे | Updated: June 19, 2025 18:30 IST2025-06-19T18:28:49+5:302025-06-19T18:30:49+5:30
- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...याची अनुभूती घेण्यासाठी निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश केला आहे. वरुणराजाचा अभिषेक, हरिनाम गजराने उद्योगनगरी दुमदुमली आहे.

Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत
पिंपरी : बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..., याची अनुभूती घेण्यासाठी निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश केला आहे. वरुणराजाचा अभिषेक, हरिनाम गजराने उद्योगनगरी दुमदुमली आहे.
देहूकारांचे आदरातिथ्य स्वीकारून सकाळी तुकोबारायांचा पालखी सोहळा वारीची वाट चालू लागला. इनामदार वाड्यामध्ये देहू देवस्थानाच्या वतीने महापूजा करण्यात आली.
पहिली अभंगाआरती अनगड शहावली बाबा दर्गा येथे झाली. भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आणि कल्पना काशीद यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे तरीही वारकऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही. दुपारी चिंचोली येथे दुपारचा विसावा झाला. त्यानंतर देहूरोड मार्गे पालखी सोहळा सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी चिंचवडच्या सीमेवर पोहोचला.
त्यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. रेनकोट छत्री घेऊन वारकरीची वाट चालत होतो.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये भक्ती शक्ती चौकामध्ये सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पालख्यांचे स्वागत करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिंडी प्रमुखांचे स्वागत केले. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजय खोराटे आधी उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले.
वारकऱ्यांचा उत्साह अपूर्व
शहरामध्ये ठीक ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली. भक्ती शक्ती चौकामध्ये अभूतपूर्व गर्दी झाली होती. पाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. याचवेळी महापालिकेच्या कक्षा समोर मोहक फुलांनी सजवलेला रथ आला. उड्डाणपूलाखाली भर पावसातही वारकरी भाविक सोहळा अनुभवत होते. त्यानंतर निगडीमध्ये काही काळ पालखीला विसावा घेतला.
त्यानंतर सायंकाळी पालखी सोहळा आकुर्डी येथे विसावला.