Ashadhi Wari 2025 : वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By विश्वास मोरे | Updated: June 18, 2025 21:32 IST2025-06-18T21:23:19+5:302025-06-18T21:32:58+5:30

'पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. गर्दी होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. थोडे- थोडे वारकरी मंदिरात सोडले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, वारकरी अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्यांना माऊलींचे दर्शन महत्वाचे असते.'

Ashadhi Wari 2025 Warkari devotees are self-reliant and disciplined; Chief Minister Devendra Fadnavis | Ashadhi Wari 2025 : वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Wari 2025 : वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी: पोलिसांनी सर्वाना दर्शन मिळावे, म्हणून व्यवस्था केली आहे. वारकरी स्वयंशित, शिस्तीत दर्शन घेणारा आहे. कुणाच्या सुरक्षेची गरज त्यांना नाही, कारण ते आपल्या माउलीला भेटायला आहे आहेत, असे मत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.   

देहूगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले. पूजा केली.  यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी दिंडयांना तासंतास मंदिराबाहेर उभे केले, पोलिसांचे नियोजन फसले होते. त्यामुळे वारकऱ्यांना त्रास झाला. येथील सुरक्षाव्यवस्था यावर माध्यमांनी विचारले.  त्यावर मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, 'पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. गर्दी होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. थोडे- थोडे वारकरी मंदिरात सोडले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, वारकरी अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्यांना माऊलींचे दर्शन महत्वाचे असते.'   



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात पादुकांची पूजा करणे आणि दर्शन करण्याचे भाग्य मला मिळाले, हा आनंदाचा क्षण आहे. भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी देव,  देश आणि धर्माचे रक्षण केले.  देशातीलच सर्व भाविक वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरला जात असतात.  त्यामुळे वारीचे विशेष महत्त्व आहे.'

Web Title: Ashadhi Wari 2025 Warkari devotees are self-reliant and disciplined; Chief Minister Devendra Fadnavis