कंपन्यांना पाणी पुरविण्याच्या वादातून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 20:10 IST2021-05-21T20:10:36+5:302021-05-21T20:10:52+5:30

म्हाळुंगे येथे चाकण तळेगाव रस्त्यालगत अतुल तानाजी भोसले यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता.

Arrested for killing a businessman in a dispute over water supply to companies | कंपन्यांना पाणी पुरविण्याच्या वादातून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कंपन्यांना पाणी पुरविण्याच्या वादातून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी : कंपन्यांना पाणी पुरविण्याच्या वादातून व्यावसायिकाचा खून केल्या प्रकरणी तिघांना भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. भोसरी स्मशान भूमी जवळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

आकाश उर्फ गण्या रवी घरमाळे (वय २०, रा. तुपे आळी, म्हाळुंगे इंगळे, ता. खेड), ऋषिकेश उर्फ गोट्या सुनील भालेराव (वय २०, रा. बौद्धवाडा, भीम नगर, म्हाळुंगे इंगळे, त. खेड), अभिषेक बुध्दसेन पांडे (वय १८, रा. पवारवाडी खालूंब्रे, ता. खेड, मूळ रा. मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.

म्हाळुंगे येथे चाकण तळेगाव रस्त्यालगत अतुल तानाजी भोसले यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. भोसले यांचा कंपन्यांना पाण्याचे टँकर पुरविण्याचा व्यवसाय होता. या वादातून आरोपींनी भोसले यांचा खून केला. खून प्रकरणातील आरोपी भोसरी स्मशान भूमी जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर आणि संतोष महाडिक यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: Arrested for killing a businessman in a dispute over water supply to companies