शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:21 IST

देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन/नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते.

पिंपरी : पिंपरी - चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शहरातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन/नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. आरटीओने मंगळवारी याबाबतचे आदेश दिले आहेत.देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन/नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१८ मध्ये दिले होते. तसेच २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला दिले होते. या अधिकारांतर्गत दिल्लीसह अनेक राज्यांनी एसएसआरपी बंधनकारक केले आहे.पण, महाराष्ट्र राज्यात अजूनही २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्यात आलेले नव्हते. पण, आता राज्य परिवहन विभागाने राज्यातील २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ३१ मार्च पर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घेणे बंधनकारक केले आहे. पिंपरी चिंचवड आरटीओसाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत पिंपरी-चिंचवड आरटीओच्या हद्दीत पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, मावळ आणि लोणावळा तालुक्यांत वाहनांना नंबरप्लेट लावण्यात येणार आहे.हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी काय आहे प्रक्रिया?महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग पोर्टल लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाहनचालकांना या बुकिंग पोर्टलवर नोंदणी करुन स्लॉट बुकिंग करावे लागणार आहे. त्यानंतरच वाहनांना ही नंबरप्लेट लावून मिळणार आहे.हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे शुल्कवाहनाचा प्रकार - शुल्कदुचाकी - ४५०तीनचाकी - ५००चारचाकी वाहने- ७४५ 

शहरातील वाहनांसाठी एका खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत शहरातील वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यात येणार आहेत. नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी या नंबरप्लेट बसवून घ्याव्यात. - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहनअधिकारी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRto officeआरटीओ ऑफीसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस