Pimpri Chinchwad: नात्याला काळिमा फासणारी घटना; बापाने केला मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 13:20 IST2023-06-08T13:17:11+5:302023-06-08T13:20:01+5:30
पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली ...

Pimpri Chinchwad: नात्याला काळिमा फासणारी घटना; बापाने केला मुलीचा विनयभंग
पिंपरी : नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी झोपलेली असताना तिच्याशी गैरवर्तन करत वडिलांनीच तिचा विनयभंग केला. ही घटना डिसेंबर २०२२ मध्ये घडली. याप्रकरणी मुलीने भोसरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.६) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिच्या आई-वडिलांचे आपसात जमत नाही. डिसेंबर २०२२ मध्ये फिर्यादी ही झोपलेली असताना वडिलांनी तिचे तोंड दाबून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. तसेच शनिवारी (दि.३) सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी व मावशीसह तिची आई हिला समजावून घरी घेऊन येण्यासाठी गेले असता आरोपीने याने त्यांना शिवीगाळ करत निघून जा असे म्हणत धमकी दिली.