शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..! तो फोन ठरला शेवटचा; पुण्याच्या इरफानचा विमान अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:16 IST

ईददिवशीच आम्ही भेटलो, गप्पा मारल्या, सोबत जेवणही केले, ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली, त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

नेहरूनगर (पिंपरी, जि. पुणे) : ‘‘अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..!’’ असे फोनवर सांगत तो विमानात बसला आणि काही वेळातच त्याचे विमान कोसळले. बावीस वर्षांच्या तरण्याबांड देहाचा कोळसा झाला... पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर येथील इरफान समीर शेखची ही दर्दभरी दास्तान. एअर इंडियात क्रू मेंबर असलेल्या इरफानचा अहमदाबाद येथे गुरुवारी विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी शुक्रवारी सकाळी समजली आणि अवघे शहर सुन्न झाले.

इरफानने अम्मी-अब्बू-भय्यासोबत आठवडाभरापूर्वी साजरी केलेली बकरी ईद शेवटचीच ठरली. इरफान शेख एअर इंडिया कंपनीत कॅबिन क्रू म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत होता. संत तुकारामनगर परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील स्कूलमध्ये तो दहावीपर्यंत, तर पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकला. मुंबईत हवाई वाहतुकीतील तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो आधी विस्तारा कंपनीत आणि नंतर एअर इंडियात दाखल झाला. वडील समीर नूरमहंमद शेख यांचा पराठ्याचा व्यवसाय, तर आई तसलीम गृहिणी आहेत. मोठा भाऊ अमीर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात नोकरीस आहे.

बकरी ईद साजरी करण्यासाठी सुटी घेऊन इरफान आठ दिवसांपूर्वी घरी आलेला. आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा यांच्यासोबत ईद साजरी करून ९ जून रोजी मुंबई येथे कामावर गेला. गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानात क्रू मेंबर म्हणून त्याची ड्यूटी होती. विमानात जाण्यापूर्वी आईला फोन करून त्याने निरोप दिला आणि काही वेळातच काळाने घात केला. त्यानंतर एअर इंडियाकडून त्याच्या घरी कळविण्यात आले. आई-वडील आणि मोठा भाऊ तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले. शुक्रवारी सकाळी त्याच्या चुलत्यांकडून ही बातमी परिसरात समजली. मनमिळाऊ स्वभावाच्या उमद्या तरुणाच्या मृत्यूने अवघ्या शहरावर शोककळा पसरली.

शंकेची पाल चुकचुकली आणि...

इरफान नेहमी विमानात बसण्यापूर्वी आईला फोन करून कळवत असे. गुरुवारच्या दुर्घटनेनंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहताना आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घरातील सगळेच सैरभैर झाले. त्यानंतर काही वेळातच फोन आला आणि ती बातमी ऐकावी लागली.

इरफान सुटीवर आला की मला भेटायचा यायचा. ईददिवशीच आम्ही भेटलो होतो. गप्पा मारल्या. सोबत जेवणही केले. ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली. त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. - फिरोज शेख, चुलते, संत तुकारामनगर

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAccidentअपघातGujaratगुजरातairplaneविमानFamilyपरिवारDeathमृत्यूAir Indiaएअर इंडिया