शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

मोडीत निघालेल्या पारंपरिक मूर्तिकलेत रंगले अख्खे कुटुंब

By admin | Updated: August 31, 2015 03:49 IST

जागतिकीकरणाच्या लाटेत अनेक पारंपरिक व्यवसाय मोडीत निघाले. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी अशा कुटुंबीयांनी अन्य पर्यायी व्यवसाय निवडले. अशाच

नारायणपूर : जागतिकीकरणाच्या लाटेत अनेक पारंपरिक व्यवसाय मोडीत निघाले. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी अशा कुटुंबीयांनी अन्य पर्यायी व्यवसाय निवडले. अशाच पारंपरिक व्यवसायात जम बसवून चांबळीमधील राजेंद्र कुंभार आणि कुटुंबीयांनी देखण्या गणेशमूर्ती तयार करण्यात तालुकाभरात लौकिक मिळविला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. या आनंददायी सोहळ्याची चाहूल लागताच गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी सर्वत्र तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामात व्यग्र आहेत. चांबळीमधील राजेंद्र कुंभार यांचे संपूर्ण कुटुंबीयही मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहे. या कुटुंबीयांचा मूर्ती तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते मूर्ती बनविण्याचे काम घरच्या घरीच करतात. त्यांनी तयार केलेल्या मूर्तींना मोठी मागणी आहे. यंदा त्यांनी गणेशाच्या एक हजार मूर्ती बनविण्याचे नियोजन केले आहे. सध्या सहाशे मूर्तींचे काम पूर्ण झाले असून चारशे मूर्तींचे काम बाकी आहे. त्यांच्याकडे अगदी पन्नास रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत. (वार्ताहर)