Air India Plane Crash : विमान अपघातातील इरफान शेखचा मृतदेह आज ताब्यात मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:54 IST2025-06-21T12:53:51+5:302025-06-21T12:54:45+5:30
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून १२ जून रोजी उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन विमान मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले.

Air India Plane Crash : विमान अपघातातील इरफान शेखचा मृतदेह आज ताब्यात मिळणार
पिंपरी :अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातील मृतांचे डीएनए जुळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी-चिंचवड येथील इरफान सलीम शेख यांचे डीएनए जुळले आहेत. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन शेख यांचा मृतदेह शनिवारी (दि. २१) कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर नेहरूनगर येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून १२ जून रोजी उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच एअर इंडियाचेअहमदाबाद-लंडन विमान मेघनीनगर येथील मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. त्यात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केबिन क्रूचा भाग असलेले पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगरमधील इरफान शेख यांचाही मृत्यू झाला होता.
शेख यांच्या मृतदेहाचे डीएनए नमुने जुळवण्यासाठी इरफानच्या भावाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. ते नमुने जुळले आहेत. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. लवकर मृतदेह ताब्यात मिळाला, तर इरफानच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील, असे काका फिरोज शेख यांनी सांगितले.