शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

पुण्यानंतर आता हिंजवडी परिसरात रानगव्याचा 'गवगवा' ; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 11:38 IST

गेल्या महिनाभरात दोनदा दिले होते.

पुणे: गेल्या महिनाभरात कोथरूड व बाणेर अशा दोन ठिकाणी रानगव्याने दर्शन दिले होते. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज हिंजवडी परिसरातील माणगाव येथे एका शेतकरी कुटुंबाला रानगवा दिसला आहे. रानगव्याच्या दर्शनाने मात्र परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आयटीनगरीतील माणमध्ये गव्याचे दर्शन झाले. पहाटे साडेपाचच्या सुमारास येथील राक्षेवस्ती येथे हा रानगवा आढळून आला. पांडुरंग राक्षे म्हणाले, पहाटेच्या सुमारास कामाला असणाऱ्या गड्याने गोठयातील बैल सोडून बाहेर बांधले, त्यांना चारा घेऊन तो आला असता गवा बैलांशेजारी गवा उभा असल्याचे त्याने पहिले. सुरवातीला धुक्यामुळं आम्हाला समजलं नाही मात्र मॉर्निंग वॉक करुन परतलेल्या जयवंत राक्षे यांनी गवा असल्याचे ओळखताच आम्ही घरात धाव घेतली. आरडा ओरडा झाल्याने गवा नदीच्या दिशेने शांत पणे निघून गेला असं पांडुरंग राक्षे यांनी सांगितले.  

दरम्यान, खाण्या पिण्याचा ओढीने अथवा इतर जनावरांची चाहूल लागल्याने तो नदीकडून राक्षे वस्तीकडे आला असावा असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत असून नववर्षाच्या सुरवातीलाच माणमध्ये रानगवा आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. तसेच गव्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोथरूडमध्ये आलेल्या रानगव्याने सोडला होता प्राण..  पुणे शहरातील कोथरूड उपनगरातील महात्मा सोसायटीत रानगवा आला असल्याचे तेथील रहिवाशांनी कळवले होते. बुधवार आज पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसताच एकच धांदल उडाली होती. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर रानगवा कोथरूडमधील पौड रस्त्यावरील भारतीनगर सोसायटी ऋतुगंध बंगला परिसरात वनविभागाच्या जाळ्यात अडकला होता. त्यानंतर भुलीच्या इंजेक्शनमुळे तो बेशुध्द पडला. त्यानंतर, वन विभागाने त्यास गाडीतून नेले, पण काही वेळातच त्याने आपला जीव सोडला.

दुसऱ्या घटनेत बावधन येथील एचसीएमआरएल पाषाण तलावालगत असलेल्या भिंतीजवळ पुन्हा एकदा गवा आढळून आला होता. पाच तास उलटून गेल्यानंतर हे अद्याप गव्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आले नव्हते.रेस्क्यू टीमला देखील गव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यासाठी प्रयत्न कसोशीने प्रयत्न केले होते. त्यानंतर तो नैसर्गिक अधिवासामध्ये सुखरूप परतला होता.  

टॅग्स :hinjawadiहिंजवडीforestजंगलFarmerशेतकरी