शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे : चौदा वर्षांनी मिळाला अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 9:23 PM

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांची निवड झाली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांची निवड झाली आहे. चौदा वर्षांनी प्राधिकरणाला अध्यक्ष मिळाला आहे. प्राधिकरण अध्यक्षपदासाठी मुंडेगटाची सरशी झाली आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या निर्मितीपासून ४६ वर्षांपैकी निम्याहून अधिक कालावधीत प्रशासकीय राज होते. याचे प्रमुख कारण म्हणजे 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दुसरे सत्ताकेंद्र होऊ नये, म्हणून दक्षता घेतली होती. शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे असताना त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मदतीने २००१ मध्ये समिती नियुक्त केली होती. अध्यक्षपदी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांची निवड झाली होती. त्यानंतर २००४ ला समितीचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर गेली चौदा वर्षे प्राधिकरणावर लोकनियुक्त समिती नियुक्त झाली नव्हती.

       भाजपची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड मधील भाजपा कार्यकर्त्यांनी समितीवर निष्टावानांना संधी द्यावी, अशी मागणी केली होती. अध्यक्षपदी जुण्यांना की नव्यांना संधी यावरून पिंपरी-चिंचवडच्या भाजपाच्या नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. या पदावर गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांनी दावा केला होता. अध्यक्षपदासाठी मुंडेचे निष्ठावान कार्यकर्ते सदाशिव खाडे यांच्या नावाची शिफारस महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. खाडे यांच्या नावाची कुणकुण लागल्याने भाजपातील स्थानिक नेत्यांनी आपापल्या समर्थकांची नावे लावून धरली होती. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळे आणि प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या निवडी जाहिर केल्या. त्यात खाडे यांना संधी मिळाली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMRDAपीएमआरडीएPresidentराष्ट्राध्यक्ष