महिलेवरील गोळीबारप्रकरणी अॅड. सुशील मंचरकर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:01 IST2018-06-16T16:01:07+5:302018-06-16T16:01:07+5:30
सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत.

महिलेवरील गोळीबारप्रकरणी अॅड. सुशील मंचरकर अटकेत
पिंपरी : पिंपरीत एका ३५ वर्षीय महिलेवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अॅड. सुशील मंचरकर यांना शुक्रवारी सायंकाळी भोसरीतील गवळीमाथा येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुशील मंचरकर हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती आहेत. ९ जून रोजी एका ३५ वर्षीय महिलेवर पिंपरीतील एच. ए कॉलनीत अज्ञातांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी मंचरकर यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंचरकर हे गवळी माथा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी सापळा रचून मंचरकर यांना अटक केली.