प्रशासनाची वाढली ‘खाबूगिरी’, महापालिकेत वर्षभरात सातवी कारवाई, आठ जण जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:39 AM2017-12-23T06:39:57+5:302017-12-23T06:40:24+5:30

एखादा लिपिक एवढे पैसे वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय घेऊ शकत नाही. कोणाची सही होणार होती. या अधिका-याचेही नाव एसीबीने तपासात पुढे आणायला हवे. लेखा विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांना राजकीय वरदहस्त असल्याने ते सुसाट सुटले आहेत. सत्ताधारी व प्रशासनाचे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असे धोरण आहे, असा आरोप बहल यांनी केला आहे.

 Administration increased 'Khabagiri', 7th round of action in the municipal corporation and eight people trapped in the year | प्रशासनाची वाढली ‘खाबूगिरी’, महापालिकेत वर्षभरात सातवी कारवाई, आठ जण जाळ्यात

प्रशासनाची वाढली ‘खाबूगिरी’, महापालिकेत वर्षभरात सातवी कारवाई, आठ जण जाळ्यात

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासनाची खाबुगिरी वाढतच आहे. महापालिकेत लाचखोरीचे लोण वाढत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी लेखा विभागातील एकास लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. गेल्या वर्षभरातील ही सातवी कारवाई असून, आजपर्यंत आठ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून, त्यात महापालिकेतील विविध विभागांतील लेखा विभागातील लिपिकांची संख्या अधिक आहे.
महापालिकेच्या लाचखोरीच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजपर्यंत आठ जण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. २२ मार्चला महापालिकेच्या शिक्षण मंडळातील बाबासाहेब राठोड यांना वीस हजारांची लाच घेताना पकडले होते. त्याच दिवशी प्रभारी शिक्षण अधिकारी अलका कांबळे यांनाही वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर २४ एप्रिल रोजी आयुक्त दिनेश वाघमारे यांचा स्वीय्य सहायक राजेंद्र शिर्के यास बारा लाखांची लाच घेताना महापालिका भवनात पकडले होते. त्यानंतर अतिक्रमण विभागातील २७ एप्रिलला अजय सिन्नरकर यांस सहा हजारांची लाच घेताना पकडले होते. १३ मे रोजी आरोग्य विभागातील सहायक आरोग्यधिकारी तानाजी दाते यांना १० हजारांची लाच घेताना पकडले आहे. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे लेखाधिकारी किशोर बाबूराव शिंगे (वय ५१, रा. रहाटणी, पुणे) याला ३१ जुलैला पकडले होते. त्यानंतर आज लेखाविभागातील लिपिकास चार हजारांची लाच घेताना पकडले आहे. आजपर्यंतच्या कारवायांमध्ये आठ जणांना एसीबीने पकडले आहे. दोनच दिवसांपूर्वी पालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी लेखाविभागातील लाचखोरीवर आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर आज कारवाई झाली. गेल्या वर्षभरातील कारवाई लाचखोरांत लिपिकांची संख्या अधिक आहे.

उंदीर पकडला, बोका मोकाटच!
लाचखोरीच्या प्रकरणामुळे महापालिकेचा लेखा विभाग चर्चेत आला आहे. पारदर्शकतेचा आव आणून खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला आहे. बहल म्हणाले, ‘‘उंदराची शिकार झाली. बोका मोकाटच आहे. संबंधित कॅशियर हा मुख्य लेखाधिका-यांचा कलेक्टर होता. पूर्वी एखाद्या फाईलसाठी पाच पंचवीस रुपये असे चहापाणी घ्यायचे. मात्र, आता हे दर दहा पटींनी वाढविले आहेत. इनवर्डसाठी दोनशे, बिल तरतुदीसाठी दोनशे, लाखाचे बिल तपासणीसाठी शंभर रुपये दर झाला आहे. त्यामुळे लेखा विभागातील अधिकारी रोज घरी किती पैसे घेऊन जात असतील? १५९ कोटींच्या बिलांमध्येही लूट करणारे सूत्रधार हे लेखा विभागातीलच आहेत.
सत्ताधा-यांचा जनतेच्या पैशावर दरोडा
सत्ताधा-यांनी याच अधिका-यांच्या मदतीने जनतेच्या पैशांवर दरोडा टाकण्यात मदत केली आहे. हाच खरा पारदर्शक कारभार आहे. फाईल मंजूरसाठी वरिष्ठांची सही घेण्यासाठी दीड लाखांच्या बिलासाठी चार हजार रुपये मागितले. एखादा लिपिक एवढे पैसे वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय घेऊ शकत नाही. कोणाची सही होणार होती. या अधिका-याचेही नाव एसीबीने तपासात पुढे आणायला हवे. लेखा विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांना राजकीय वरदहस्त असल्याने ते सुसाट सुटले आहेत. सत्ताधारी व प्रशासनाचे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असे धोरण आहे, असा आरोप बहल यांनी केला आहे.
लेखा विभागातील लिपिकास अटक-
१पिंपरी : महापालिका शाळेच्या बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बिल काढण्यासाठी चार हजारांची लाच मागणा-या महापालिकेतील लेखा विभागातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेबाराला करण्यात आली. प्रकाश जयसिंग रोहकले, वय ३९, कनिष्ठ लिपिक, रा. पिंपलेश्वर निवास, तुळजाभवानीनगर, पिंपळे गुरव) असे लाचखोराचे नाव आहे.
२लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीस वर्ष वयाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत बायोमेट्रिक मशिन्स दुरुस्तीचे काम आहे. हे एक लाख ६४ हजार रुपयांचे बिलाचे फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन बिलाचा चेक देण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागातील रोहकले यांनी चार हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सुरेखा घार्गे यांनी सापळा लावून रोहकले यांना रंगेहात पकडले.
३बिले मंजूर करण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागात अडवणूक केली जाते. सुमारे दीडशे कोटींची बिले मंजूर करण्यासाठी तीन टक्के घेतल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. पंतप्रधान कार्यालयात याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्यानंतरही बिले मंजूर करण्यासाठी अडवणूक लूट सुरू असल्याचे प्रकरण आज उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईने महापालिकेतील लेखाविभागात अधिकारी आणि कर्मचाºयांची लाचखोरी उघडकीस आली आहे. लेखाविभागातील लाचखोरी रोखावी, कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title:  Administration increased 'Khabagiri', 7th round of action in the municipal corporation and eight people trapped in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.