पिंपरीत रविवारी ३५४ नागरिकांवर विनामास्कची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 18:09 IST2021-05-24T18:09:02+5:302021-05-24T18:09:29+5:30

विकेंड लॉकडाऊनमधेही बेशिस्त नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन

Action without mask on 354 citizens in Pimpri on Sunday | पिंपरीत रविवारी ३५४ नागरिकांवर विनामास्कची कारवाई

पिंपरीत रविवारी ३५४ नागरिकांवर विनामास्कची कारवाई

ठळक मुद्देकोरोना विषाणूंच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

पिंपरी: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असतानाही बेशिस्त नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशाच पद्धतीने रविवारी विनामास्क फिरणाऱ्या ३५४ जणांवर विकेंड लॉकडाऊनला पोलिसांनी कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत घट होत असली तरी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही बेशिस्त नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच काही नागरिक मास्कचा योग्य वापर करत नसल्याचे दिसून येते. अशा नागिरकांवरही कारवाई होत आहे.

पोलिसांनी रविवारी विनामास्क फिरणाऱ्यांवर केलेली कारवाई पुढीलप्रमाणे आहे. एमआयडीसी भोसरी (५०), भोसरी (१८), पिंपरी (१६), चिंचवड (५६), निगडी (०८), आळंदी (०४), चाकण (०५), दिघी (१३), सांगवी (२४), वाकड (१०) हिंजवडी (५७), देहूरोड (३८), चिखली (२२), तळेगाव एमआयडीसी (०९), रावेत चौकी (११), शिरगाव चौकी (१३), या पोलीस ठाण्यांतर्गत पोलिसांनी रविवारी ३५४ जणांवर कारवाई केली.

Web Title: Action without mask on 354 citizens in Pimpri on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.