पिंपळे सौदागर येथे जुगार अड्यावरील १३ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:31 IST2018-08-08T14:28:44+5:302018-08-08T14:31:45+5:30

पोलिसांकडून मंगळवारी रात्री जुगार खेळणाऱ्या जणांवर कारवाई करुन ४५ हजार २०० रुपये रोख आणि काही साहित्य जप्त केले.

Action on 13 wagers of Gambling Tribunal at Pimpale Sadadagar | पिंपळे सौदागर येथे जुगार अड्यावरील १३ जणांवर कारवाई

पिंपळे सौदागर येथे जुगार अड्यावरील १३ जणांवर कारवाई

ठळक मुद्देकारवाई झाल्यानंतरही पुन्हा तेच लोक जुगार अड्यावर

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील स्मशान भूमीजवळ असलेल्या पत्राशेडमध्ये पैसे लावून मोठ्या प्रमाणात जुगार सुरु असल्याची खात्रीशीर माहिती युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास तेथे छापा टकाला.  पोलिसांना तेथे १३ जण पत्ते खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन ४५ हजार २०० रुपये रोख आणि काही साहित्य जप्त केले आहे.
अरविंद नागनाथ साबळे (वय ४२, रा. रमाबाईनगर, पिंपरी), संदीप सुरेश कांबळे (वय ५२, रा. विशाल आंगण जवळ, पिंपरी), दिलीप महातप्पा स्वामी (वय ५९, रा. अमरदिप कॉलनी, रहाटणी), पोपट धर्मराज धेंडे (वय ३८, रा. पिंपळे सौदागर), विकास परमेश्वर वामने (वय १९, रा. पिंपळे सौदागर), सागर दिनकर मोरे (वय २९, सुसगाव), संदीप अंबादास साळवे (वय १८, रा. पिंपळे सौदागर), प्रविण भारत मस्के (वय १९, रा. पिंपळे सौदागर) , शिवाजी बाळासाहेब बाबर (वय २८, रा. काटेवस्ती, पिंपळे सौदागर), निलेश विश्वनाथ शिंदे (वय ३३, रा. दापोडी), सुखदेव बाबुराव सोनवणे (वय ५६, औंध रोड, खडकी), इब्राहिम जावेद खान (वय ४९, रा. नानापेठ, पुणे), आणि भारतकुमार लखन पंडित (वय २४, रा. येरवडा) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
 जुगार खेळत असताना,या पुर्वी यातील काही जणांवर कारवाई झाली होती. कारवाई झाल्यानंतरही पुन्हा तेच लोक जुगार अड्यावर आढळून आले आहेत. त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? हे पोलिसांकडून तपासले जात आहे.

Web Title: Action on 13 wagers of Gambling Tribunal at Pimpale Sadadagar