पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील आरोपीला पिंपरीत अटक, स्थानिक पोलीस मात्र अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:45 IST2018-06-02T14:06:56+5:302018-06-02T15:45:21+5:30

कट्टर हिंदुत्ववादाच्या विरोधात लिखाण करणाऱ्या गौरी लंकेश हत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

The accused in the journalist Gauri Lankesh murder case arrested, but local police in dark | पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील आरोपीला पिंपरीत अटक, स्थानिक पोलीस मात्र अंधारात

पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील आरोपीला पिंपरीत अटक, स्थानिक पोलीस मात्र अंधारात

ठळक मुद्देपत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे धागेदोरे पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याचा संशय

पिंपरी: पत्रकार व बंगळुरु येथील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणाशी संबंधित संशयित आरोपीला पिंपरी चिंचवड येथून कर्नाटकच्या विशेष तपास यंत्रणेच्या (एसआयटी) पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी रात्री (दि. ३१ मे) करण्यात आली आहे. अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र या कारवाईबाबत स्थानिक पलिसांना अंधारात ठेवल्याची बाब समोर आली आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे धागेदोरे पिंपरी-चिंचवडमध्ये असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बंगळुरुमधील आरआरनगरमध्ये ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गोळ्या झाडून पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती.
कट्टर हिंदुत्ववादाच्या विरोधात लिखाण करणाऱ्या गौरी लंकेश हत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या हत्ये प्रकरणातील आरोपी के. टी. नवीनकुमार यांच्या विरोधात एसआयटीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर या हत्ये प्रकरणात अमोल काळे उर्फ भाईसाहब (वय ३९) यास ताब्यात घेतले आहे
अटक केलेल्यांमध्ये संशयितांपैकी अमोल काळे हा चिंचवडमधील मालिक कॉलनीतील अक्षय अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. तसेच, एसआयटीच्या या कारवाईत हिंदुत्ववादी संघटनांशी संबधित आणखी काही जणांना अटक करण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस विठ्ठल कुबडे यांच्याशी संपर्क साधला असता, चिंचवड पोलीस ठाण्यात अशी काही नोंद नाही, विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The accused in the journalist Gauri Lankesh murder case arrested, but local police in dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.