भरधाव ट्रकची खासगी बसला धडक, तिघांचा मृत्यू; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 12:26 IST2017-10-16T12:15:39+5:302017-10-16T12:26:56+5:30

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातसत्र सुरूच असून ट्रकने खासगी बसला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे.

Accident on Mumbai-Pune Express Highway; Triple death | भरधाव ट्रकची खासगी बसला धडक, तिघांचा मृत्यू; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात

भरधाव ट्रकची खासगी बसला धडक, तिघांचा मृत्यू; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातसत्र सुरूच असून ट्रकने खासगी बसला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हून अधिक जखमी आहेत. लोणावळयानजीक सकाळी ७च्या सुमारास हा अपघात झाला.
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात संदीप पवार, उमेश नायकवडे आणि तानाजी नायकवडे यांचा मृत्यू झाला असून ८हून अधिक जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर महामार्गावर कोंडी झाली होती. 

Web Title: Accident on Mumbai-Pune Express Highway; Triple death