रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तरुणाला शिवीगाळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 22:12 IST2021-07-08T22:12:26+5:302021-07-08T22:12:35+5:30

रावेत येथील शिंदे वस्ती येथे ही घटना घडली.

Abusing a young man in fear of a revolver; Crimes against five people | रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तरुणाला शिवीगाळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तरुणाला शिवीगाळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

पिंपरी : तरुणाला शिवीगाळ करून जात असलेल्या पाच जणांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. या कारणावरून पाच जणांनी तरुणाला रिव्हॉल्वरसारख्या हत्याराचा धाक दाखवून पुन्हा शिवीगाळ केली. बुधवारी दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास रावेत येथील शिंदे वस्ती येथे ही घटना घडली.

रामेश्वर संभाजी भोंडवे (वय ३०, रा. शिंदेवस्ती, रावेत) यांनी याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल हुलावळे व त्याच्या चार साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुधवारी दुपारी कारमधून आले. त्यांनी फिर्यादी भोंडवे आणि स्वप्निल केंजळे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी निघून जात असताना फिर्यादी यांनी आरोपींना शिंदे वस्ती चौकात अडवले. 'तुम्ही आम्हाला का शिवीगाळ केली, असा फिर्यादी यांनी जाब विचारला. यावरून आरोपी अनिल आणि त्याच्या चार साथीदारांनी फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. तसेच एकाने फिर्यादी यांच्या छातीला रिव्हॉल्वर लावले आणि पुन्हा शिवीगाळ केली.

Web Title: Abusing a young man in fear of a revolver; Crimes against five people