जुन्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत घराला लावले कुलूप ; भोसरीत पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 16:47 IST2021-03-22T16:46:42+5:302021-03-22T16:47:08+5:30

फिर्यादी ह्या आरोपी यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतात.

Abusing and beating the house for old reasons; Five persons were booked in Bhosari | जुन्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत घराला लावले कुलूप ; भोसरीत पाच जणांवर गुन्हा दाखल

जुन्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करत घराला लावले कुलूप ; भोसरीत पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच बाहेर ढकलून घराला बाहेरून कुलुप लावुन घेतले. भोसरी येथे रविवारी (दि. २१) हा प्रकार घडला. 

अर्चना रवींद्र जळमकर (वय ३९, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमिला अशोक टेकाळे, आनंद अशोक टेकाळे (दोघे रा. वाकड) व तीन अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना जळमकर या आनंद टेकाळे यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतात. फिर्यादी व त्यांचा मुलगा तसेच मुलगी घरात असताना आरोपीने तेथे येऊन बेकायदा जमाव केला. जुन्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन फिर्यादी व त्यांच्या मुलांना शिवीगाळ केली. फिर्यादी तसेच त्यांचा मुलगा व मुलगी यांना घराच्या बाहेर काढले. मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचे भाडे थकल्याच्या कारणावरून कोर्टात केस चालू आहे हे माहिती असतानाही आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून बाहेर काढून घराला बाहेरून कुलूप लावून घेतले आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Abusing and beating the house for old reasons; Five persons were booked in Bhosari